कृती : रवा तुपावर जरा भाजून घ्यावा. फोणडी करून, त्यात दोन्ही डाळी तांबूस होईपर्यंत परताव्यात. नंतर त्यात मोहरी, कढीलिंब, आले बारीक चिरून, मिरच्यांचे तुकडे, ताक, चवीप्रमाणे मीठ घालून व तीन वाट्या पाणी घालून उकळण्यास ठेवावे. उकळी येण्याच्या बेताला त्यात रवा हळूहळू ढवळत ढवळत घालावा. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर काजू किंवा शेंगदाणे घालावेत. पहिजे असल्यास खोबरे घालावे.