साहित्य : 2 वाटी मुगाची डाळ,पाऊण वाटी तेल, 2 मिरच्या, मीठ व साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर, खोबरे, मोहरी, हिंग.
कृती : सर्वप्रथम डाळ चार तास भिजत ठेवावी व नंतर चाळणीत घालून कुकरमध्ये ठेवून, चांगली वाफवून घ्यावी. एका कढईत तेल गरम करून त्यात मिरच्यांचे तुकडे घालून, त्या फोडणीत वाफवलेली डाळ घालावी व मंद आचेवर ठेवून एक-दोन वाफा आणाव्यात. त्यांत नंतर चवीप्रमाणे मीठ व साखर घालून, पुन्हा शिजेपर्यंत वाफ आणावी. कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करावी.