1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

व्हेजिटेबल ऑम्लेट

ND
साहित्य : 500 ग्रॅम टोमॅटो, 1 कोबी, 2 कांदे, 250 ग्रॅम मटर, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 1 जुडी कोथिंबीर, 200 ग्रॅम बेसन, 1 चमचा मीठ, 1/4 मिरे पूड.

कृती : टोमॅटोचा रस काढून त्यात बेसन, मिरेपूड व मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. मटरचे दाणे वाटून, कांदा, कोबी आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या व आलं मिश्रणात मिसळून द्यावे.

पॅनमध्ये 1 लहान चमचा तूप गरम करून त्यात हा घोळ धिरड्या सारखा पसरावा व दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावे. गरम गरम व्हेजिटेबल ऑम्लेट तयार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा