1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

शिंगाड्याच्या पीठाचा ढोकळा

शिंगाड्याच्या पीठाचा ढोकळा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट, मीठ, ओल्या मिरच्या, जिरे, आले, दही, कोथिंबीर, थोडे ओले खोबरे, सोडा, चार चमचे तूप.

NDND
कृती : एक वाटी पाण्यात दोन चमचेदही व एक वाटी शिंगाड्याचे पीठ रात्री भिजवून ठेवावे. सकाळी त्यात चवीप्रमाणे मीठ, ओल्या मिरच्या, आले व जिरे वाटून घालावे. तसेच चार चमचे तूप घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी व थोडा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घालून पीठ कालवून घ्यावे. नंतर थाळीला तूप लावून त्यावर हे पीठ घालावे व थाळी कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्यावे. वड्या कापून वर ओले खोबरे घालावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा