1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
  6. समर स्पेशल : बर्गर

Burger in Marathi | समर स्पेशल : बर्गर

WD
साहित्य- बटाटे, गाजर, हिरवा वाटाणा, बर्गर बन, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, तेल, गाजर, कांदा, चीज स्लाईस, टोमॅटो सॉस, आमचूर पावडर.

कृती- प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. त्याचप्रमाणे गाजर आणि मटारही उकडून घ्यावा. बटाटे कुस्करून घ्यावेत आणि त्यात कॉनफ्लॉवर, आमचूर पावडर, मीठ, मटार, गाजर आणि ब्रेड क्रम्स घालावे. या सर्व मिश्रणाचे गोल गोळे करून घ्यावेत. आणि हे गोळे डीप फ्राय करून घ्यावेत. बर्गर बनवर केचअप लावून घ्यावा आणि त्यावर काकडी आणि कांद्याच्या चकत्या लावाव्यात. त्यानंतर बटाटय़ाच्या स्लाईसही त्यावर ठेवाव्यात. त्यानंतर चीज स्लाईस ठेवून. डीप फ्राय केलेले गोळा त्यात घालावा. हा घरगुती बर्गर खाण्यास तयार.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा