माझे अश्रू मीच पुसते
सौ. स्वाती दांडेकर
माझे अश्रु मीच पुसतेयेता गंगा यमुनाडोळ्यात माझ्या त्यांनामीच परतवतेमाझे अश्रु मीच पुसते ।।1।।होता छळ भावनांचाकाळीज माझे घायाळ होतेत्यावर प्रेमाचा लेप मीच लावतेमाझे अश्रु मीच पुसते ।।2।।होता अपमान माझास्वाभिमानाची ठेच सोसतेसंयमाचे पांघरूण त्यावर मीच घालतेमाझे अश्रु मीच पुसते ।।3।।होता दु:ख मनीनिराशा माझ्या मनी येतेपुन्हा आशेचा दीप मीच लावतेमाझे अश्रु मीच पुसते ।।4।।करते अपेक्षा पूर्ति सर्वांचीउपेक्षा माझ्या पदरात येतेकर्तव्याचे पांघरूण मनी घालतेसंयमाचे कवच धारण करतेमाझे अश्रु मीच पुसते ।।5।।