suvichar

आई

Updated: रविवार, 10 मे 2020 (12:32 IST)
तिनेच पाजले 
 
जन्म तर दिलाच पण दाणापाणी
देतानाच पंखातही उंचच उंच उडण्याचे
भरारी घेण्याचे बळ दिले चांगुलपणा, मेहेनत
यातील यश आणि खऱ्याची ताकत
ओळखण्याची कुवत
सन्मार्गावर चालण्याची बुद्धी बुद्धीच्या बळावर जग
जिंकता येतं हा विश्वास हे सगळं देणारी
माझी आई
 
जगावेगळी नाही म्हणणार मी
पण एक खास व्यक्तिमत्व आहे
जिला अजूनही माझ्या आनंदात
माझ्या प्रगतीत मनापासून आनंद होतो
अजूनही मी खूप पुढे जावे
प्रामाणिक प्रयत्नांनी नेहेमीच यश मिळवावे
हीच तिची आत्यंतिक इच्छा असते
आमचे मतभेद हो.. होतात ना
पण ते विषयाची खोली समजून घेण्यासाठी
विषयाचा,परिस्थितीचा आढावा घेताना...
त्यातही उमेद असते जिज्ञासा असते
एकमेकींची विषयाला समजून घेण्याची
गरज आणि इच्छा असते 
 
तेव्हाच प्रेम मात्र 
निरपेक्ष आणि निखळ करावं ते आईनेच
हात देण्यासाठी कायम तयार असतात
फक्त मी यशच मिळवावे आणि कुठे कमी नसावे
या तिच्या आशावादाला आणि 
प्रबळ इच्छाशक्तीला माझे नमन
अशी आई 
 
मी किती होऊ शकेन यात मला यश मिळेल 
की नाही या मापदंडात मी कितपत उतरेन
कुणास ठाऊक पण मोजक्या साधनात
आणि उचित प्रयत्नात आयुष्यात समाधान
आणि यश नक्की मिळते 
प्रयत्न महत्त्वाचा हे मात्र तिनेच शिकवले
जे आजही मला मार्ग दाखवते
आणि प्रत्येक पिढीने अंगी बाणवावे असे
हे नियम, आयाम मला घालून देणारी
माझ्या कलागुणांना नेहेमीच वाव मिळेल 
हे पाहणारी
माझी आई 
 
माझी गुरु माझी प्रिय सखी
अशी माझी आई आणि तिची महती
आणि तिच्या न फिटणाऱ्या 
ऋणाची कहाणी
- माधवी कुऱ्हेकर

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

हरितालिका पूर्वी घरीच हायड्राफेशियल करा, या सोप्या टिप्स अवलंबवा

अतिरिक्त प्रथिने हानिकारक ठरू शकतात; योग्य प्रमाण आणि त्यातील धोके जाणून घ्या

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : यशासाठी अहंकाराचा त्याग आवश्यक

सावधान! पावसाळ्यात मशरूम खाताय; थोडासा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो

पुढील लेख
Show comments