शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (07:24 IST)

आई जन्मावीच लागते, हृदयातून...

आई ही अत्यन्त सुंदर भावना आहे,
संवेदनशील मनाची धनी आहे,
मनांन असावं मातृत्व अंगी सऱ्यांच्या,
जन्म देणच नव्हे, पूर्तते साठी त्याच्या,
आई जन्मावीच लागते, हृदयातून,
काळजी दिसावी लागते त्या डोळ्यातून,
स्पर्श असा तो मायेचा, न करता ही समजलेला,
ओलावा असा की आपोआप उमगून आलेला,
कुणीही असू शकतो "आई"हे जगन्मान्य,
ममते नि भरलेलं मन,न कुठली ही अट अन्य!!
....अश्या सर्व "आई"ला शुभेच्छा !!
..अश्विनी थत्ते.