1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र

दहशतवाद्यांकडून सिंगापूरकडे रूपयांची ‍डिमांड

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्या करून हॉटेल ताज तसेच ओबेरॉयमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाकडे मोठ्या प्रमाणात रूपयांची मागणी केली आहे.

हॉटेल ताजमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकंना बंदिस्त केले आहे. त्यात काही सिंगापूर तर काही नागरिक मलेशियातील आहेत. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयात फोन लावून सिंगापूरच्या नागारिकांना सोडविण्यासाठी काही रूपयांची मागणी केली असल्याचा खुलासा मुंबई क्राईम ब्रॅंचने केला आहे. दहशतवाद्यांनी सिंगापूर मुख्यालयाला किती रूपयांची डिमांड आली असल्याचे व हॉटेल ताजमध्ये सिंगापूर व मेलेशियातील किती नागरिकांना बंदिस्त केले असल्याचे अद्याप कळू शकलेले नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा