Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (15:31 IST)
महाराष्ट्रातही आता कमांडो पथक
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्रातही आता एनएसजी प्रमाणे कमांडो पथक स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे.
दहशतवाद्यांशी झालेल्या झुंजीत महाराष्ट्र पोलिसांचे मोठे नुकसान झाले असून, 370 जण जखमी झाल्याचे पाटील म्हणाले. यानंतर राज्यात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एनएसजी प्रमाणेच कमांडो पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
या हल्ल्यात मारले गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली असून, पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही पाटील यांनी या प्रसंगी केली.