मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:19 IST)

मालाडमध्ये बांधकाम सुरु असताना इमारतीचा 20 व्या मजल्याचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

मुंबईतील मालाड मध्ये 23 मजली इमारतीचा 20 व्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व दिंडोशी गोविंद नगर परिसरात दुपारी 12:10 च्या सुमारास  बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून ही घटना घडली  23 मजली इमारतीच्या 20व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळला. या अपघात तिघांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस,अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit