मुंबई बोट दुर्घटनेत 7 वर्षाचा मुलगा बेपत्ता, शोध मोहीम सुरूच
Mumbai boat accident: मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी झालेल्या पर्यटक बोटीच्या भीषण अपघातातील बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर नौदलाच्या जहाजाची पर्यटक बोटीला धडक बसल्याची घटना घडली. या भीषण अपघातानंतर बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा शोध घेण्याची मोहीम शुक्रवारीही सुरू आहे. एका अधिकारींनी ही माहिती दिली.
तसेच 18 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली असून मंगळवारी सायंकाळी 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हार्बर परिसरात घडलेल्या या घटनेची नौदलाने चौकशी सुरू केली आहे. अधिका-याने सांगितले की शोध आणि बचाव मोहिमेचा भाग म्हणून, बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी तटरक्षक दलासह नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटी देखील तैनात करण्यात आल्या आहे.
Edited By- Dhanashri Naik