बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (14:10 IST)

डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांकडून सामूहिक अत्याचार

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यात भोपर परिसरात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यामध्ये 30 आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील 22 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
पीडित मुलीची दोन तरुणांशी मैत्री होती. त्यांच्यातील एकाने सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. नंतर दोघांनी एका व्हिडिओच्या आधारे पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी अन्य मित्रांना वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली तिला त्यांच्याकडे स्वाधीन केले. त्यांनीही तिच्यावर आळीपाळीने सामुहिक अत्याचार केले.
 
गेल्या 9 महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. भीतीपोटी तिने घरात या प्रकाराबद्दल सांगितले नाही. तिच्या एका नातलग महिलेला या प्रकाराचा संशय आला. तिने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला.
 
बुधवारी तिच्या पालकांनी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. प्रथामिक चौकशीत आधी 30  आरोपींचे नावे समोर आली आहे. पोलिसांनी गेल्या काही तासांमध्ये 21 जणांना ताब्यात घेतले आहे तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.