सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (16:00 IST)

अंबरनाथमध्ये कारखान्यात मशीनच्या बेल्टमध्ये अडकल्याने मुलाचा मृत्यू

child death
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका बिस्किट कारखान्याच्या कट्ट्यात अडकून एका 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या लहान मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात एकच शांतात पसरली.
 
एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, ही घटना सोमवारी अंबरनाथमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार “आयुष चौहान नावाचा चिमुरडा त्याच्या आईसोबत एका बिस्किट फॅक्टरीत गेला होता, जिथे त्याची आई टिफिन वितरित करते. मुलाने मशीनच्या कट्ट्यातून बिस्किट उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो अडकला. अडकल्यामुळे सर्वांना एकच धक्का बसला मशीन बंद करून चिमुरड्याला बाहेर काढण्यात आले व तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिमुरड्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला शोक अनावर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी चिमुरड्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला व नंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. 

Edited By- Dhanashri Naik