शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (11:01 IST)

मोठी घोषणा : ''माझी लाडकी बहीण योजना'' करिता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता

mukhyamantri Ladki Bahin Yojana
महाराष्ट्राच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम पाठवली जात आहे. तसेच राज्य सरकारने आतापर्यंत 1.7 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
 
महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवत 2.5कोटी महिलांचा सहभाग करत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत 30सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पात्र महिलांनी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची तारीख 31जुलै होती, पण मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने 31ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख वाढवण्यात आली होती.

या योजनेंतर्गत, 21-65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे, त्यांना मासिक 1,500 रुपयांची मदत दिली जात आहे.