बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2024 (12:02 IST)

बांद्रा-वर्ली सी लिंक वरून उडी घेत एका व्यक्तीने केली आत्महत्या

suicide
मुंबईच्या एका व्यावसायिकाने आपल्या 22 वर्षीय मुलासोबत व्हाट्सऐप वीडियो कॉल करून बोलल्यानंतर बांद्रा वर्ली सी लिंक वरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मुंबई पोलिसांच्या एका आधिकारीने सांगितले की, या व्यक्तीने आपल्या मुलाला फोनवर सांगितले की, मी आत्महत्या करत आहे.तसेच हे 56 वर्षीय व्यक्ती घरी बेताची परिस्थिती असल्यामुळे चिंतीत होते. आर्थिक परिस्थिती चंगली असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असे अधिकारींनी सांगितले. पोलिसांना या व्यक्तिजवळून एक नोट मिळाली ज्यामध्ये लिहलेलं होते की सॉरी बेटा, मी आत्महत्या करीत आहे कुटुंबाची काळजी घे.
 
अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार “घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली आहे. या व्यावसायिकाने एका कारमधून टोल नाका पर्यंत लिफ्ट घेतली होती. मग ते रस्त्यातच उतरले आणि आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल केला आणि सांगितले की मी आत्महत्या करीत आहे. यानंतर यांनी समुद्रामध्ये उडी घेत आत्महत्या केली. या व्यावसायिकाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली व पोलिसांना 3 तासानंतर या व्याक्तीचा मृतदेह मिळाला. तसेच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik