मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:40 IST)

Chhagan Bhujbal छगन भुजबळांवर गुन्हा दाखल

chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरुद्ध कलम 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ फॉरवर्ड केल्याबद्दल छगन भुजबळ आणि इतरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एका तक्रारदाराने चेंबूर पोलीस ठाण्यात केली होती. ज्यामध्ये ते हिंदू धर्माविरोधात बोलत होते.
 
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. छगन भुजबळ यांच्या देवी सरस्वतीच्या चित्रावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वतीऐवजी महापुरुषांची चित्रे शाळांमध्ये लावावीत, असे विधान केले होते.
Edited by : Smita Joshi