शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (10:41 IST)

PM मोदी देणार 5G इंटरनेटची भेट, इंटरनेटच्या नव्या युगाची होईल सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला 5G इंटरनेटची भेट देणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात महानगरांसह देशातील 13 शहरांमध्ये लोकांना जलद इंटरनेट सुविधा मिळणार आहे.  
 
पीएम मोदी प्रगती मैदानावर पोहोचले. 'इंडिया मोबाइल काँग्रेस-2022' चे उद्घाटन केले.
रिलायन्स जिओने पीएम मोदींना डेमो दाखवला, एअरटेल आणि आयडिया वोडाफोनही डेमो देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इंडिया मोबाइल काँग्रेस-2022' च्या उद्घाटनप्रसंगी सकाळी 10 वाजता औपचारिकपणे 5G इंटरनेट लाँच करतील.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह 10 मोठ्या शहरांमध्ये हाय-स्पीड मोबाइल इंटरनेट सेवा प्रथम सुरू होणार आहे. 
2023 च्या अखेरीस 5G सेवा देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचेल.
रिलायन्स जिओने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम खरेदी केले. दुसऱ्या क्रमांकावर भारती एअरटेल.
पंतप्रधान मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5G शी संबंधित तंत्रज्ञानाचाही आढावा घेतील.
ते 5G आधारित ड्रोन, सीवर मॉनिटरिंग सिस्टम, आरोग्य संबंधित तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेसाठी एआय-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे शेतीचे तंत्रज्ञान पाहतील.
Edited by : Smita Joshi