गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (10:49 IST)

PM Modi Japan Visit: पंतप्रधान मोदीं शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित, जपानी पंतप्रधानांची भेट घेतली

Prime Minister Narendra Modi met Japanese Prime Minister Fumio Kishida in Tokyo
जपानमध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये भारत-जपान संबंधांवर चर्चा झाली. फुमियो किशिदा यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, मला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वाखाली भारत-जपान संबंध अधिक दृढ होतील आणि नवीन उंची गाठतील आणि आम्ही जगाच्या समस्या सोडवण्यात योग्य भूमिका बजावू.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचीही आठवण काढली. ते म्हणाले, आज या दु:खाच्या काळात आम्ही भेटत आहोत. गेल्या वेळी मी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी दीर्घ संभाषण केले होते. भारताला शिंजो आबे यांची उणीव भासत आहे.
 
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जुलैमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आबे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जपानला पोहोचले आहेत. यादरम्यान इतर देशांचे राष्ट्रप्रमुखही जपानला पोहोचण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 हून अधिक राज्य आणि सरकार प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली आहे.