1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (14:39 IST)

Firing in Russia : रशियाच्या शाळेत गोळीबार, सहा ठार, 20 जखमी

मध्य रशियातील इझेव्हस्क येथील एका शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या बातमीमुळे युक्रेन युद्धात खळबळ माजली. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था टास (TASS) ने ही बातमी दिली आहे. गोळीबाराची घटना इझेव्हस्क येथील शाळा क्रमांक 88 मध्ये घडली. हल्लेखोराने गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. 

वृत्तानुसार, सोमवारी रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत एका बंदुकधारीने गोळीबार केला. मेसेंजर अॅपवरील एका निवेदनात, प्रदेशाचे गव्हर्नर, अलेक्झांडर ब्रेचलोव्ह यांनी सांगितले की ते शहराच्या शाळा क्रमांक 88 वर पोहोचले आहे. सुरक्षा आणि मदत आणि बचाव पथके शाळेत पोहोचली आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडल्याचे राज्यपालांनी सांगितले. रशियाच्या अंतर्गत मंत्रालयाने सांगितले की, किमान सहा जण ठार आणि 20 जखमी झाले आहेत.