गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (14:08 IST)

मुंबईच्या बोरीवलीमध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचा जवान जखमी

A fire broke out in a building in Mumbai's Borivali
मुंबईच्या बोरिवली येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या अपघातात अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग मोठी असून संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरल्याची माहिती आहे.
 
अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली. ऑपरेशन दरम्यान एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आग इतकी भीषण आहे की धुराच्या लोटाने संपूर्ण परिसर काळा झाला आहे. 
 
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आसपासच्या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहे. गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागल्यचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.