1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2024 (11:53 IST)

डोंबिवलीत पिशवीत लघवी करून फळ विक्रेत्याने केले लज्जास्पद कृत्य

Dombivli urine scandal
मुंबईत एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून घृणास्पद कृत्य केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

डोंबिवलीत निळजे परिसरात रस्त्यावर स्टॉल जवळ उभा असलेल्या एका फळ विक्रेत्याने पिशवीत लघवी केली आणि लघवीची पिशवी गाडीवर ठेवलीआणि हात न धुता फळे विकू लागला. तो लघवी करत असताना काही महिला तिथून निघत होत्या. 

या घाणेरड्या फळ विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होतातच मानपाडा पोलीस प्रकरणाचा तपास  तिथे पोहोचली आणि आरोपी फळ विक्रेताला ताब्यात घेतले.

या घाणेरण्या आणि लज्जास्पद कृत्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी करत आहे.  
Edited By - Priya Dixit