मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 22 सप्टेंबर 2024 (14:38 IST)

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

arrest
महिलांवर आणि मुलींवर अत्याचार वाढत आहे. महिलांवर आणि मुलींवर राज्यात अत्याचाराचे प्रकरण वाढत आहे. आता नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. 

नवी मुंबईत एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कळंबोली पोलिस ठाण्याचे  एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. 30 वर्षीय व्यक्तीने 19 सप्टेंबर रोजी करंजाडे भागातील अन्य एका आरोपीच्या (29) घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

मुलीने घरी आल्यावर घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे  बलात्कार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून भारतीय न्यायिक संहितेच्या कलमच्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) (बलात्कार) आणि 3(5) (एकाच हेतूने अनेक व्यक्तींनी केलेले गुन्हेगारी कृत्य) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit