सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (19:29 IST)

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

राज्यात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता ठाण्यात बळजबरी शेजारच्या घरात घुसून 38 वर्षीय महिलेवर तिच्या मुलीसमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घडली आहे. 
ठाण्यातील भाईंदर मध्ये आरोपी शेजारच्या घरात रात्री 11 वाजता बळजबरी शिरला आणि महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीसमोर महिलेचे हातपाय ओढणीने बांधून महिलेवर बलात्कार केला.आरोपीने मुलीवर हल्ला केला.

नंतर दुसऱ्या दिवशी महिलेने पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेनुसारआरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह घरात एकटीच होती. आरोपी महिलेचा शेजारी राहायचा  गुरुवारी रात्री 11 वाजता आरोपी महिलेचा घरात बळजबरी शिरला आणि त्याने पीडितेचे हात पाय ओढणीने बांधले आणि तिच्यावर तिच्या लहान मुलीच्या समोर बलात्कार केला तसेच मुलीवर देखील हल्ला केला. 

पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.  
 Edited By - Priya Dixit