गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 15 सप्टेंबर 2024 (13:08 IST)

चेंबूर मध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर ऑटो रिक्षा चालकाकडून लैंगिक अत्याचार

rape
राज्यात मुलींवर अत्याचार कमी होण्याचे नावच नाही. बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे  अवघे महाराष्ट्र हादरले आहे. आता मुंबईतील चेंबूर परिसरात एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर परीसरातील एका शाळेत जात असताना  ऱिक्षा चालकाने मुलीला फसवून नेलं नंतर तिला एका पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच कोणालाही काहीही सांगायचं नाही अशी धमकी दिली. 

घरी सांगितल्यावर आईला ठार मारेन अशी धमकी दिली. मुलीने घरी गेल्यावर घडलेलं सर्व सांगितले नंतर कुटुंबीयांनी चेंबूर पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात विनयभंग तसेच पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit