1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (14:34 IST)

मुंबईला लवकरच मिळणार 7वी वंदे भारत ट्रेन

Vande Bharat
केंद्र सरकार मुंबईकरांना आणखी एक वंदे भारत ट्रेन भेट देणार आहे. मुंबईला लवकरच सातवी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही वंदे भारत मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर धावू शकते. ही ट्रेन सुरू झाल्याने मुंबई, पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
 
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेस आहे जी 518 किमीचे अंतर सुमारे 10.30 तासांत कापते. महालक्ष्मी एक्सप्रेस चा सरासरी वेग ताशी48.94 किमी आहे.अद्याप मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले नाही. 
 
मुंबई ते पुण्याला जोडणारी ही दुसरी वंदे भारत आहे. मध्य रेल्वे मुंबईतून पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालणार आहे. तर पश्चिम रेल्वे मुंबई आणि गुजरात दरम्यान दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहे. 

महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची एकूण संख्या 11 पर्यंत वाढेल, ज्यात नागपूर आणि पुण्याच्या सध्याच्या सेवांचाही समावेश आहे. याशिवाय, आणखी दोन वंदे भारत मार्ग – नागपूर-सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी – लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. 
Edited by - Priya Dixit