गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (15:02 IST)

मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात सापडले झुरळ

vande bharat
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये अन्नपदार्थांमध्ये कीटक किंवा इतर असामान्य वस्तू सापडल्याच्या घटना दाखवल्या जातात. तशीच एक घटना वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये घडली आहे. शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या एका कुटुंबाला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मिळालेल्या त्यांच्या जेवणात झुरळ दिसले.
ही घटना कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्य रिक्की जेसवानी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या डाळमध्ये मेलेले झुरळ आढळल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आली. तसेच त्यांनी रेल्वे अधिकाऱ्याकडे ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे.  
 
IRCTC ने गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला-
या घटनेची दखल घेत IRCTC ने प्रदात्यावर दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, IRCTC ने या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Edited By- Dhanashri Naik