गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (13:27 IST)

महाराष्ट्र : या दिवशी महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा होऊ शकते

विधानसभेच्या निवडणूक राज्यात पुढील काही महिन्यात होऊ शकतात. उद्यापासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु होऊ शकते. तसेच 21 ऑगस्ट सकाळी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी चर्चा उचापसून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
तसेच बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल देशमुख तर अनिल परब आणि संजय राऊत यांच्या ठाकरे गटाकडून सहभाग असेल. तसेच या बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित राहू शकतात. या बैठकीमध्ये किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे समजेल.
 
तसेच काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान घेतल्या. व किती या कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे अजून घोषित केले नाही. तसेच आता उद्या बैठक होणार आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला उद्या होणाऱ्या बैठकीमधून जाहीर केला जाऊ शकतो.

Edited By- Dhanashri Naik