रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (17:17 IST)

रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिर्डीत तणाव, एफआयआर दाखल, सीएम शिंदे संतांच्या पाठीशी

eknath shinde
रामगिरी महाराजांनी आपल्या प्रवचनात पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या मुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. छत्रपती संभाजी नगर, नाशिक, शिर्डी, जळगाव येथे शेकडो लोक रस्त्यावर आले. काही ठिकाणी चकमक झाली त्यात 18 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.भद्रकाली परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. 

वैजापूर पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 302 अंतर्गत महाराजांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर जाणीवपूर्ण लोकांच्या भावना भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजी नगर मध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यांनतर  काही तासांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांसह एकाच मंचावर दिसले. महाराजांच्या मठाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात त्यांचे सरकार असताना कोणीही धर्मगुरुंना हात लावू शकत नाही. 

थोर संतांचा आशीर्वाद आपल्या सरकारला लाभला असून महाराष्ट्रात संतांना कोणीही हात लावू शकत नाही. . 
एफआयआर दाखल आणि लोकांच्या विरोध प्रदर्शनावर रामगिरी महाराज म्हणाले, मला सरकार कडून कायदेशीर नोटीस आल्यावर मी या प्रकरणावर भाष्य करेन.
Edited by - Priya Dixit