रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (10:35 IST)

अकोल्यामध्ये सरकारी शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या शिक्षकाला अटक

arrested
महाराष्ट्रातील अकोल्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकावर मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तक्रारीनंतर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात, विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका 47 वर्षीय सरकारी शिक्षकाला अटक केली आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने  शिक्षकाविषयी तिच्या पालकांकडे तक्रार केली तेव्हा ही घटना उघडकीस आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीनंतर अकोल्यातील काजीखेड परिसरातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली.
 
एका विद्यार्थ्याने बालकल्याण समितीच्या टोल फ्री क्रमांकावरही फोन करून शिक्षकाविरोधात तक्रार केली. तसेच सहा विद्यार्थिनींनी देखील तक्रार केली की शिक्षक त्यांना गेल्या चार महिन्यांपासून अश्लील व्हिडिओ दाखवत आहेत. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Edited By- Dhanashri Naik