रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (18:02 IST)

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागात इमारतीच्या 15व्या मजल्यावर भीषण आग

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम भागात इमारतीच्या 15व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागली.आगीवर नियंत्रण मिळ्वण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या हजर होत्या. घटनास्थळी बीएमसी पथकाव्यतिरिक्त पोलीस ही तैनात होते. 

जोगेश्वरी पश्चिमच्या एसव्ही रोडवरील ईई हाईट टॉवरला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. 

इमारतीच्या वीजमीटर बॉक्स मधून आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग बघताबघता इमरतीच्या बी विंग मधील 13व्या, 14व्या आणि15व्या मजल्यावर पसरली.आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण शॉर्टसर्किट सांगितले जात आहे. 
 
Edited By- Priya Dixit