शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (15:09 IST)

दोन मुलांची आई भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली, ठाणे पोलीस शोधात

rape
2 मुलांची आई 24 वर्षाची महिलेचा ठाणे पोलीस शोध घेत आहे. ही महिला भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली आणि नुकतीच परतली आहे. बनावट कागदपत्रांचा आधार घेत ती पाकिस्तानात गेल्याचा संशय ठाणे पोलिसांना आहे. तसेच महिलेला पासपोर्ट आणि व्हिसा मिळविण्यात मदत करण्याऱ्याचा शोध पोलीस घेत आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भेट झाली आणि त्यांची मैत्री झाली. या व्यक्तीला भेटण्यासाठी ती भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली.या महिलेने तिथे लग्न केल्याचा दावा महिला करत आहे. तिच्याकडे लग्नाचे प्रमाणपत्र पोलिसांना सापडले आहे. 
या महिलेचे लग्न भारतात झाले असून ती मुळात उत्तरप्रदेशातील आहे. ठाण्यात कामानिमित्त ती राहत होती. गेल्या महिन्यात महिला आपल्या मुलांसह पाकिस्तानात गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिलेला पाकिस्तानात जाण्यासाठी कोणी मदत केली याचा तपास ठाणे पोलीस करत आहे. 
Edited By- Priya Dixit