शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (09:49 IST)

लोन देण्याच्या नावावर फसवणूक, 2 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Fraud in the name of giving loan
लोन एजन्सी आणि एका खासगी बँकेची 3.26 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 ते डिसेम्बर 2023 दरम्यान एका लोन देणाऱ्या एन्जसीच्या कर्मचाऱ्याने लोन अर्ज प्रक्रियेत फेरफार केली आणि त्याच्या साथीदारांसह बॅंकेतून लोन मिळवण्यासाठी खोटी माहिती दिली.

आरोपीने पैसे मिळाल्यावर कर्जाची परतफेड नाही केली. या प्रकरणामुळे लोन एजन्सी आणि बँकेचे   3.26 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी 30 जून रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीना पकडण्यासाठी आणि गैरव्यवहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. आरोपीवर विश्वासभंग, फसवणूक, बनावटगिरी च्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit