महाराष्ट्रामध्ये 'लाडकी बहीण योजना' लाभार्थी महिलांचे वाढवले वय
महाराष्ट्रामध्ये या महिन्यात सुरु करण्यात आलेली. लाडकी बहीण येजना सुरु झाली आहे. या योजनेच्या सुरवातीलाच एकनाथ शिंदे सरकार वर विरोधी पक्षाने टीकास्त्र सोडायला सुरवात केली होती. यावर सीएम म्हणाले की, या योजनेकरिता सरकारजवळ पैशांची कमी नाही.
महाराष्ट्रात या वर्षाच्या आत विधानसभा निवडणूक आहेत. महाराष्ट्रात निवडणुकांपूर्वी अनेक योजनांची घोषणा शिंदे सरकारने केलेली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंगळवारी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनाला घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. एक जुलै पासून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
21 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलांना मिळणार या योजनेचा लाभ. यासोबतच शिंदे म्हणाले की, आता या योजनेच्या लाभ वय वर्ष 65 असलेल्या महिलांना देखील घेता येईल. ते म्हणाले की, अधिकारी व कर्मचारी स्तर वर कोणतीही गडबड झाली तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
तसेच सीएम म्हणाले की या योजनेसाठी जेवढे पैसे लागणार आहे त्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैशांची कमी नाही. या योजनेमुळे राज्यातील महिलांना लाभ मिळणार आहे.
Edited By- Dhanashri Naik