संबंधित माहिती
- कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान धरणात बुडून 2 कमांडोचा मृत्यू तर 4 जवानांना वाचवण्यात यश
- लातूर मध्ये डॉक्टराच्या चुकीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले, ऑपरेशन दरम्यान पोटात राहिला रुमाल
- महाराष्ट्रातील आरोपीने मध्यप्रदेशात रेल्वेमधून उडी मारत केली आत्महत्या
- मुंबईत भरधाव कारने 2 जणांना दिली धडक, एकाचा मृत्यू
- पुण्यात नदीत उडी घेत एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, पण 8 तासांनंतर सुखरूप बाहेर
मुंबईमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; दोन जखमी
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत अपघाताच्या घटना घडत आहे. मिळालेय माहितीनुसार मुंबईतील लोअर परळ परिसरातून आग लागल्याची बातमी समोर आली तर आता याच परिसरातून लोअर परळमध्ये एका कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघात एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात पण दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी कार चालक मनीष चंद्रभान सिंग याला ताब्यात घेतले असून, एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
