शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (11:05 IST)

सुरतमध्ये गणेश पंडालवर दगडफेक, पोलिसांनी 32 जणांना घेतले ताब्यात

Surat
गुजरातमधील सुरतमध्ये काल रात्री गणेश पंडाल मध्ये दगडफेकची घटना घडली आहे. सैयदपुरा परिसरामध्ये अज्ञात लोकांकडून दगड फेक करण्यात आली आहे. ज्यामुळे या क्षेत्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी यामध्ये 32 जणांना ताब्यात घेतले आहे. 
 
या घटनेमुळे मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झाले. ज्यामुळे स्थिती तणावपूर्ण झाली आहे. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून अतिरिक्त सुरक्षा बल तैनात केले आणि परिथितीवर नियंत्रण मिळवले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली गेली असून चौकशी सुरु झाली आहे. पोलीस तपास करीत आहे की, ही घटना कोणी घडवून आणली तसेच यामध्ये कोणकोण सहभागी आहे. 
 
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, "सुरतमधील सय्यदपुरा भागातील गणेश पंडालवर सहा जणांनी दगडफेक केली. सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा प्रचार करणाऱ्या इतर 27जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच तपास सुरू असून सुरतच्या सर्व भागात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.