1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. A sudden massive fire broke out at IIT Powai in Mumbai.

मुंबईतील IIT पवईमध्ये अचानक भीषण आग; दोन मुलांसह पाच जण होळपले

मुंबईतील पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे कॅम्पसमधील एका वसतिगृहात सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने आग लागली, ज्यात दोन मुलांसह पाच जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी रात्री सुमारे १०.२५ वाजता वसतिगृह क्रमांक ६ मध्ये ही घटना घडली.एका अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना घाटकोपर येथील बीएमसी-संचालित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आयआयटी बॉम्बे, पवई कॅम्पसमध्ये एका हॉस्टेलच्या आवारात गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे गुरुवारी कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ च्या आवारात हा अपघात झाला. हॉस्टेल क्रमांक ६ च्या जवळ एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू आहे. तेथील खासगी कामगारांच्या शेडमध्ये जेवण बनवत असताना गॅस सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाली आणि अचानक आगीचा भडका उडाला. या आगीत दोन लहान मुलांसह एकूण ५ जण जखमीझाले आहे. सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुढील लेख
World Post Day 2026 जागतिक टपाल दिन; महत्त्व आणि इतिहास