1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 मे 2025 (14:13 IST)

मुंबई : पुतण्याचे काकुसोबत होते प्रेमसंबंध, मग घडली दुर्दैवी घटना, आरोपीने केलं आत्मसमर्पण

crime news
मुंबईतील भायखळा परिसरातील एका महिलेने तिच्या पुतण्याने मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ५० दिवसांनंतर, आरोपीने आत्मसमर्पण केले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाचे त्याच्या काकुसोबतच संबंध असल्याचा आरोप आहे. आग्रीपाडा पोलिसांनी शनिवारी रात्री एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्यावर त्याच्या काकूला त्रास देण्याचा आरोप आहे, ज्यामुळे महिलेने भायखळा येथील १३ व्या मजल्यावरील फ्लॅटवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सुमारे ५० दिवसांपूर्वी घडली. यानंतर आता आरोपी पुतण्याने आत्मसमर्पण केले आहे.
यानंतर, पुतण्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.