1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 मे 2025 (12:35 IST)

सोलापुरात रेल्वे पुलाखाली पाण्यात अडकलेल्या बसमधून 27 जणांना वाचवले

27 people rescued from bus stuck in water under railway bridge in Solapur
सध्या राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सर्वत्र पावसाने झोडपले आहे. रस्ते पाण्याच्या खाली गेले आहे. राज्यातील काही भागात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरात रेल्वे पुलाखाली अडकलेल्या बस मधून अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
काल रात्री तुळजापूर- बार्शी रस्त्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पावसाच्या पाण्यात अडकली. बस तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने निघाली असून बार्शी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली अडकली.
मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पाणी शिरले. बसमध्ये पाणी शिरल्याने ती थांबली. अचानक बसमध्ये पाणी शिरू लागल्याने प्रवासी काही काळ चिंतेत पडले.
तथापि, बार्शी शहरातील पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई केली आणि सर्व 27 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दरम्यान, बस रस्त्यातच बिघाड झाल्यामुळे तुळजापूर-बार्शी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
Edited By - Priya Dixit