1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 27 मे 2025 (09:59 IST)

पुणे मुंबई महामार्गावर एसटी बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात एका भरधाव एसटी बसने पाठीमागून दुचाकीला धडक  दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहे. 
राहुल तुपे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सुहास कांबळे (19) व गणेश सोमवंशी गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार कांबळे आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे गेट हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीला एसटी बसची पाठी मागून धडक लागली. या अपघातात राहुल तुपे याचा मृत्यू झाला. तर ओंकार कांबळे आणि गणेश सोमवंशी गंभीर जखमी झाले. 
अपघाताचा देहूरोड पोलीस तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit