1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 मे 2025 (14:43 IST)

मुंबई पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात

accident
मुंबई पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला.सुदैवाने अपघातात कोणतीही जनहानी झाली नाही. 
सदर घटना शुक्रवारी सकाळी 23 मे रोजी 11 वाजेच्या सुमारास औंढे पुलाजवळ  घडली.
राज्य परिवहन महामंडळाची शिवशाहीबस मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना लोणावळा जवळ औंढे पूल येथे बसचा टायर फुटून बस अनियंत्रित होऊन विरुद्ध लेन मध्ये जाऊन रस्त्याच्या कडेला डोंगराला जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली. लोहगडाकडे जाणारा रास्ता काही काळासाठी बंद करण्यात आला.
अपघाताची माहिती तातडीने आपत्कालीन सेवांना देण्यात आली असून ते वेळीच घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणली.