प्रयागराज महाकुंभावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू
Jabalpur News : जबलपूरमध्ये ट्रक आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशातील सात जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण नुकतेच प्रयागराज महाकुंभ येथील संगमात स्नान करण्यासाठी गेले होते आणि परतताना अपघाताचे बळी पडले.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एका मिनी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रयागराज महाकुंभातून आंध्र प्रदेशला परतणाऱ्या सात भाविकांचा मृत्यू झाला. जबलपूरचे जिल्हाधिकारीम्हणाले की सिहोरा शहराजवळ सकाळी ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, ट्रक आणि मिनी बसच्या धडकेत आंध्र प्रदेशातील सात जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक महाकुंभात स्नान करून परतत होते.
प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की ट्रक महामार्गावर चुकीच्या दिशेने येत होता, ज्यामुळे हा अपघात झाला. ज्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक अपघातस्थळी दाखल झाले.
Edited By- Dhanashri Naik