पंतप्रधान मोदी आज तीन दिवसांय फ्रान्स दौऱ्यावर रवाना
Prime Minister Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवार, 10 फेब्रुवारीपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना होणार आहे. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी फ्रान्सला भेट देत आहे.
ALSO READ: विदर्भात उद्योगांसाठी अतिरिक्त १० हजार एकर जमीन उपलब्ध होणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान, ते 11 फेब्रुवारी रोजी मॅक्रॉन यांच्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील. एआय समिटनंतर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स सीईओ फोरमला संबोधित करतील.पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा देखील होईल. १२ फेब्रुवारी रोजी, दोन्ही नेते पहिल्या महायुद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. दोन्ही नेते मार्सेली येथे भारताच्या वाणिज्य दूतावासाचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. फ्रान्सहून पंतप्रधान मोदी अमेरिकेला जातील.
Edited By- Dhanashri Naik