1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 17 मे 2025 (12:18 IST)

अटल सेतूवर कार डंपरच्या अपघातात एकाचा मृत्यू

accident
शुक्रवारी पहाटे मुंबईतील अटल सेतूवर एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तो प्रवास करत असलेल्या कारचा डंपरशी धडक झाला. शिवडी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर पहाटे 2.30 वाजता हा अपघात झाला.
मुंबईहून पनवेलकडे जाणारी भरधाव वेगाने येणारी बीएमडब्ल्यू कार वरील नियंत्रण सुटून  एका डंपरला धडकली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात चेंबूर येथील रहिवासी पुनीत सिंग माजरा या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की डंपर अटल सेतूच्या बाजूच्या रेलिंगला धडकला.
या अपघातात डंपरचा चालकही जखमी झाला. धडक एवढी भीषण होती की, बीएमडब्ल्यूचा पुढील भाग डंपर मध्ये अडकला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले गाडीची डिक्की उघडून चालकाला बाहेर काढण्यात आले असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  
या अपघातासंदर्भात शिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सविस्तर तपास सुरू आहे.