बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (09:12 IST)

मुंबईतील महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला वाढदिवसाला अडीच लाख रुपयांची सोन्याची चेन भेट दिली

gold chain gifted dog
काही लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते आणि ते पाळीव प्राणी जणू त्यांच्या घरातील सदस्य होतात. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी ते काहीही करतात. 

त्यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांचे सर्व लाड पुरवतात. असाच प्रकार मुंबईत घडला आहे एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला आणि त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने चक्क अडीच लाख रुपयांची सोन्याची चेन भेट म्हणून दिली. सरिता साल्दान्हा असे या महिलेचे नाव आहे. 
 
चेंबूरच्या एका ज्वेलर्स ने आपल्या इंस्टाग्राम वर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मध्ये महिला तिच्या पाळीव कुत्रा टायगर साठी  सोन्याची जाड साखळी निवडते. व्हिडिओमध्ये तिचा पाळीव कुत्रा टायगर आनंदाने शेपूट हलवत आहे. नंतर महिला कुत्र्याच्या गळ्यात आंनदाने साखळी घालते. 
ज्वेलरी स्टोरच्या मालकाने लिहिले. आमची संरक्षक सरिता यांनी आपल्या पाळीव कुत्रा टायगरचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याचा विचार केला आणि त्यासाठी ती एका ज्वेलरीच्या दुकानात गेली आणि टायगर साठी जाड आणि सुंदर चेन निवडली. 
 
पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "सुंदरपणे तयार केलेली आणि सूर्यप्रकाशात चमकणारी, ही साखळी दिवसासाठी योग्य भेट होती. मालक सरिताने तिच्या कुत्र्याला त्याच्या वाढदिवशी 2.5 लाख रुपयांची सोन्याची चेन भेट देण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. 
या व्हिडिओवर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. 
 
Edited by - Priya Dixit