1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. A woman's body was found hanging in Thane

ठाण्यात महिलेचा मृतदेह लटकलेला अवस्थेत आढळला

ठाण्यातील एका चाळीत 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.पोलिसांना हे प्रथमदर्शनी अत्म्हत्याचे प्रकरण असल्याचे दिसते .अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 
हे प्रकरण ठाण्यातील पूर्व कोळीवाडा परिसरातील एका चाळीतले आहे. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास इथल्या स्थानिकांनी पोलिसांना एका घरातून दुर्गंधी येत असल्याचे कळविले. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना घराच्या दारावर कुलूप असल्याचे आढळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घराचे कुलूप तोडले. घरात गेल्यावर पोलिसांना एक तरुणी लोखंडी रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
 
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. हे आत्महत्या आहे की घातपात पोलीस याचा तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit   
 
 
 
पुढील लेख
राहुल गांधींनी कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणात स्थानिक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत मौन तोडले