शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (13:14 IST)

ठाण्यात पाणी घ्यायला जात असलेल्या तरुणीचा विनयभंग, भावाने विरोध केल्यावर मारहाण

rape
ठाण्यात भिवंडी परिसरात एका तरुणाने 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी संध्यकाळी घडली आहे. मुलीच्या भावाने याचा विरोध केल्यावर आरोपीने त्याला लोखण्डी रॉड ने मारहाण केली.पीडित तरुणीने आरोपी तरुण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या सुंदरनगर परिसरात एका झोपडपट्टीत राहणारी 19 वर्षीय तरुणी सोमवारी संध्याकाळी सार्वजनिक नळातून पाणी आणायला जात असताना तरुणाने तिला एकटी जाताना पाहून तिला झुडपात नेऊन तिचा विनयभंग केला.पीडित तरुणीने आरोपीला धक्कादेत तिथून पळून घर गाठले आणि घडलेले भावाला सांगितले.  
 
भावाने तरुणाच्या घरी जाऊन जाब विचारल्यावर तरुणाने आणि त्याच्या कुटूंबियांनी पीडित तरुणीच्या भावाला मारहाण केली आणि लोखंडी रॉड  डोक्यात घातला त्यात तो गंभीर जखमी झाला. 

घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच तरुणीच्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुण, त्याचे वडील आणि दोन भावांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit