शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (18:54 IST)

मुंबईत चालत्या गाडीबाहेर लटकून तरुणाने केला खतरनाक स्टंट पोलिसांनी केली अटक

arrest
मुंबईच्या अंधेरी भागात चालत्या कार मध्ये एका तरुणाने रात्री उशिरा गजबजलेल्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत स्टंट करण्याचा प्रकार केला. 

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या कारचालकाला अटक केली आहे. 
मुंबईतील अंधेरी परिसरात चालत्या कारमध्ये धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीचा चालक ड्रायव्हिंग सीटवर न बसता दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप ही वाहन चालकावर केला आहे. काही मीटरचा प्रवास केल्यानंतर कार रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनाला धडकते. 
 
ही घटना 30 जुलै रोजी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे.26 वर्षीय सूरज साओ असे आरोपीचे नाव आहे. तो टुरिस्ट कॅब चालवतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री स्थानिक लोकांनी सूरजला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. स्टंट करताना तो दारूच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. 
पोलिसांनी आरोपी सूरजविरुद्ध दारू पिऊन गाडी चालवणे, गाडीत स्टंटबाजी करणे, वाहनाचे नुकसान करणे, इतरांचा जीव धोक्यात घालणे अशा गुन्ह्यांची नोंद  करत गुन्हा दाखल केला आहे. 
 Edited By- Priya Dixit