बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (21:25 IST)

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

rape
माझ्या गळ्यात धारदार काचेचा तुकडा ठेवण्यात आला होता. धमकावून मला जबरदस्तीने मुंबईला नेले. धारावी कॉलनीतील एका खोलीत ओलीस ठेवले. दोन्ही हात अनेक दिवस बांधलेले होते. खोलीत लाईट नव्हती. घर सर्व बाजूंनी बंद होते.दीड वर्ष माझ्यावर बलात्कार केला ."असे छत्तीसगडच्या एका तरुणीने सांगितले. 
 
तरुणीचे अपहरण करून तरुणाने तिला मुंबईत नेले आणि तिला धारावीत एका खोलित नेले आणि हात पाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले  तरुणीने विरोध केल्यावर तिला मारहाण केली आणि तिच्या प्रायवेट पार्टला केमिकल टाकून जाळून टाकले गर्भाशयाला इजा झाली आहे. जेवणही दिले नाही.मोबाईल देखील हिसकावून घेतला. 

सदर प्रकरण दीड वर्षापूर्वीचे आहे. पीडितेला एक अनोळखी नंबर वरुन मोबाईल फोन येतो. तरुणीने नंबर ब्लॉक केल्यावर देखील आरोपीने वेगवेगळ्या नंबर वरुन कॉल केले. एके दिवशी मुलीची प्रकृति खालावली आणि ती तिच्या गावावरून कोंडागाव येथे उपचारासाठी आली होती. ही माहिती आरोपीला समजल्यावर तो तिच्या पाठीमागे गेला आणि काचेची बाटली फोडून काचेचा टुकड़ा तिच्या गळ्यावर लावून तिला सोबत नेले नंतर मोबाईल हिसकावून घेतला आणि मुलीच्या कुटुंबियांना सांगितले की तिचे एका मुलावर प्रेम असून तिने लग्न करून स्थायिक झाली आहे.

नंतर त्याने मुलीच्या घरी  कधीच फोन केला नाही. तिला मुंबईत धारावीच्याएक खोलीत नेले तिथे अंधार होता. आरोपीने तिच्यावर बळजबरी केली आणि तिने विरोध केल्यावर पीडितेचा प्रायवेट पार्ट जाळून दिला. 

मुलीने सांगितले की, एके दिवशी आरोपी  कामावर गेला असताना तो मोबाईल सोबत घ्यायला विसरला.
संधीचा फायदा घेत तरुणीने कसा तरी मोबाईलमधून नंबर काढला. तो नंबर कापड कारखान्याच्या मालकाचा होता. आरोपी हा या कारखान्यात काम करायचा. मुलीने मालकाला फोन करून सर्व प्रकार सांगितला.

कारखान्याच्या मालकाने तिला मदत केल्याचे मुलीने सांगितले. खोलीत येवून त्याने मुलीचे हात उघडले आणि तिला लवकर निघून जाण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलीने मुंबईचे सीएसटी रेल्वे स्थानक गाठले. तिथून ट्रेन पकडली.
कशीतरी बस घेऊन अखेर ती कोंडागावला पोहोचली. घरी आल्यानंतर घडलेले सांगितले पोलिसांत तक्रार दाखल केली असून आता तिच्यावर उपचार सुरु आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे पोलिस त्याचा शोध घेत आहे. 
Edited By - Priya Dixit