माजी DGP यांच्या मुलाची आत्महत्या
छत्तीसगडचे माजी डीजीपी श्रीमोहन शुक्ला यांचा मुलगा तुषार शुक्ला यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. तसेच पोलिसांना आजून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडचे माजी डीजीपी यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी पोलिसांना हजीरा रुग्णालयातून तुषार शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येची माहिती मिळाली, जिथे ही व्यक्ती माजी डीजीपी श्रीमोहन शुक्ला यांचा मुलगा असल्याचे आढळून आले. तसेच पोस्टमोटर्मनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच मानसिक तणाव हे आत्महत्येचे प्राथमिक कारण असल्याचा संशय पोलिसांनी सांगितला आहे.
पण अजून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik